काळ्या पैशांसंदर्भात तातडीने कारवाई करा - Marathi News 24taas.com

काळ्या पैशांसंदर्भात तातडीने कारवाई करा

झी २४ तास वेब टीम, नवी दिल्ली
 
आयकर खात्याने दोषी व्यक्तीं विरोधात तातडीने कायदेशीर कारवाई करावी ज्यामुळे लोकांना त्यांची नावे कळू शकतील अस मत संसदीय समितीच्या सदस्यांनी व्यक्त केलं आहे. यासंदर्भात ज्येष्ठ भाजप नेते आणि माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांच्या अध्यक्षते खाली एक बैठक शुक्रवारी झाली. आयकर विभाग सध्या फ्रान्स सरकारने दिलेल्या माहितीच्या आधारे जिनीवातील बँकामध्ये खाती असणाऱ्या ७०० भारतीयांच्या यादीची तपासणी करत आहे.
पण अद्याप सरकारने परदेशी बँक खात्यांमध्ये बेहिशेबी संपत्ती दडवून ठेवणाऱ्या व्यक्तींची नावे जाहीर केली नाहीत. अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी समितीच्या आंतरराष्ट्रीय करारानुसार खटले दाखल करतानाच दोषी व्यक्तींची नावे सरकारला जाहीर करता येईल असं संसदयी समितीच्या सदस्यांना सांगितलं. भाजपाचे नेते लालकृष्ण अडवानी  यांनी सरकारला स्वीस बँकेत खाती असणाऱ्या ७०० भारतीयांची नावे जाहीर करण्यास सांगितलं आहे. अण्णा हजारे आणि बाबा रामदेव यांनी काळ्या पैशांच्या विरोधात रान उठवलं आहे.
 

First Published: Saturday, November 19, 2011, 10:52


comments powered by Disqus