परचक्र भेदण्यास भारताची 'आयएनएस चक्र' - Marathi News 24taas.com

परचक्र भेदण्यास भारताची 'आयएनएस चक्र'

www.24taas.com, विशाखापट्टणम्
 
आयएनएस चक्र ही नवी अत्याधुनिक पाणबुडी आज भारतीय नौदलात दाखल होणार आहे. ही पाणबुडी दाखल झाल्यामुळं नौदलाची ताकद कितीतरी पटीनं वाढणार आहे. वेगानं धाऊन शस्त्रूला चारीमुंड्याचित करण्याची क्षमता या पाणबुडीमध्ये आहे.
 

ही पाणबुडी तब्बल १०० दिवस पाण्याखाली राहू शकते. संपूर्णपणे रशियन बनावटीची असलेली ही पानबुडी १० वर्ष भाडेतत्वावर घेण्यात आलेली आहे.  या पानबुडीवर असलेल्या रि अ‍ॅक्टरमुळं तिला १ हजार हॉर्सपॉवर एवढी ताकद मिळालेली आहे. त्यामुळं ती ३० नॉटीकल मैल प्रतितास एवढ्या प्रचंड वेगाने धावू शकते.
 
भारतीय नौसेनेच्या चालक दलाला यासाठी आधीच रशियामध्ये पाणबुडी चालवण्याचं प्रशिक्षण दिलं गेलं. आयएनएस चक्र चालवण्यासाठी साधारणतः ३० अधिकारी आणि त्यांच्या सोबत ७० हून अधिक माणसांची गरज लागते. ही पाणबुडी जरी रशियन असली, तरी भारतीय बनावटीची अरिहंत ही पाणबुडीदेखील लवकरच नौसेनेत भर्ती होणार आहे.
 

First Published: Wednesday, April 4, 2012, 12:14


comments powered by Disqus