मुख्यमंत्र्यांनी लावला खाण माफियांना चाप - Marathi News 24taas.com

मुख्यमंत्र्यांनी लावला खाण माफियांना चाप

www.24taas.com, गोवा
 

गोव्यातल्या बेकायदा खाण उद्योगांविरोधात मुख्यमंत्री मनोहर पर्रिकरांनी कारवाईचा धडाका सुरू केला आहे. खाण माफियांना चाप लावण्यासाठी पर्रीकरांनी खाण संचालकांसह राज्यातले 448 खाण ट्रेडर्सचे परवाने निलंबित केले आहेत.
 
यापैकी 110 परवाने कायमस्वरुपी रद्द होण्याच्या मार्गावर आहेत. निलंबित ट्रेडर्सना आपल्या व्यवहाराची कागदपत्रे सादर करण्यासाठी 15 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. शहा आयोगाच्या अहवाल येण्यापूर्वीच मुख्यमंत्र्यांनी कारवाईचा बडगा उगारल्यामुळं खाण माफियांची दाणादाण उडाली आहे. न्यायमूर्ती शहा आयोगाच्या चौकशीनंतर गोव्यातल्या खाण व्यवसायाला आळा बसेल अशी शक्यता होती.
 
मात्र गेल्या सहा महिन्यांत तब्बल चार दशलक्ष खनिज मालाची बेकायदा निर्यात करण्यात आली आहे. विशेष म्हणजे कर्नाटकातल्या खाण व्यवसायावर सुप्रीम कोर्टानं नियंत्रण आणल्यानंतर अनेक खनिज व्यावसायिक गोव्यात कार्यरत झाले होते. पर्रिकरांनी सत्तेवर येण्यापूर्वीच अवैध खाणींविरोधात कारवाईचे संकेत दिले होते. त्यानुसार त्यांनी आता कारवाईचा धडाका सुरू केला आहे.
 
 
 

First Published: Wednesday, April 4, 2012, 12:19


comments powered by Disqus