Last Updated: Wednesday, April 4, 2012, 15:57
www.24taas.com, लंडन तुमचे हृदय हेल्दी आणि निरोगी ठेवण्यासाठी आता जास्त काही करायचे नाही, केवळ कलिंगड खाण्यावर भर दिला म्हणजे झालं. कलिंगड खा आणि हृदय ठेवा निरोगी, असा मंत्र कलिंगडावर संशोधन करणाऱ्या अभ्यासकांनी दिला आहे.
कलिंगड खल्ल्याने आपला उच्च रक्तदाब कमी करण्यास मदत होते. फ्लोरिडातील एका अभ्यासातून काही निष्कर्ष निघाले आहेत. त्यातील हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. नैसर्गिक फळांच्या रसांमुळे चांगले रक्ताभिसरण होते. त्यामुळे आपल्याला रक्तदाबाचा त्रास होत नाही. कलिंगड खाल्याने ते आरोग्यासाठी चांगले आहे.
कलिंगडाचा रस हा उच्च रक्तदाब कमी करतो. त्यामुळे आरोग्यात सुधारणा होण्यास मदत होते. अभ्यास करणाऱ्या टीमने रसायन युक्त गोल्या एक आठवडा दिल्या. तसेच डमी उमेदवारांनाही त्याच गोळ्या देण्यात आल्या. त्यातून तुलनात्मक अभ्यास करण्यात आला. जे कलिंगड खात होते, त्यांना धोका कमी असल्याचे स्पष्ट झाले. युकेमध्ये हृदयरोगाचे रूग्ण जास्त आढळून आले आहेत. याबाबतचा निष्कर्ष अमेरिकी जर्नलमध्ये प्रकाशित कऱण्यात आला आहे.
First Published: Wednesday, April 4, 2012, 15:57