Last Updated: Tuesday, March 13, 2012, 15:14
झी 24 तास वेब टीम, लंडन.पाठदुखी ही एक सामान्य समस्या असली, तरीही आज अनेक लोक या व्याधीपासून त्रस्त आहेत. अशा पाठदुखीने त्रस्त असणाऱ्या लोकांसाठी एक दिलासा देणारी बातमी आहे. ब्रिटन मधल्या वैज्ञानिकांनी एका अशा गुणसूत्रांचा शोध लावला आहे. की जे पाठदुखीसाठी जबाबदार आहे.
सायन्स मासिकात प्रसिध्द झालेल्या बातमीनुसार केंब्रिज युनिर्व्हसिटीचा संशोधकांनी उंदरावरील संवेदनशील नसांमधून एचसीएन-2 नामक जीन काढून टाकले. यानंतर उंदराला प्रत्येक दुखण्यापासून मुक्ती मिळाली असे आढळून आले.
आता पाठदुखी बरी होण्यासाठी अशी औषधे तयार होऊ शकतात, अशी संशोधकांना अशी आशा आहे. त्यामुळे पाठदुखीने हैराण असणाऱ्या लोकांना आता त्यापासून मुक्ती नक्कीच मिळेल. हे औषध एचसीएन-2 याद्वारे निर्माण होणाऱ्या प्रोटीनला थांबविण्यात मदत करेल. पाठदुखीसाठी हे प्रोटीन मोठ्याप्रमाणात कारणीभूत असते.
वैज्ञानिकांनी लावलेल्या या शोधामुळे पाठदुखीने त्रस्त झालेल्या अनेक लोकांना दिलासा मिळाला आहे. या संशोधनामुळे अनेकांना त्याचा फायदा होईल हे निश्चित मानले जात आहे.
First Published: Tuesday, March 13, 2012, 15:14