लालकृष्ण अडवाणींच्या यात्रेचा आज समारोप - Marathi News 24taas.com

लालकृष्ण अडवाणींच्या यात्रेचा आज समारोप

झी २४ तास वेब टीम, नवी दिल्ली 
 
भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या भ्रष्टाचारविरोधी जनचेतना यात्रेचा आज  नवी दिल्लीत समारोप होत आहे. अडवाणींची ही यात्रा ४० दिवस देशभरातून फिरली.
 
रामलीला मैदानावर होणाऱ्या सभेनंतर या यात्रेचा समारोप होणार आहे. या सभेत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी, लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज्य, अरुण जेटली आदी नेते उपस्थित राहणार आहेत.
 
अडवाणी यांच्या जन चेतना यात्रेची सुरुवात ११ ऑक्टोबरपासून जयप्रकाश नारायण यांचे जन्मगाव असलेल्या सिताब दियारा येथून झाली होती. ही यात्रा देशभरात २२ राज्यांतून आणि पाच केंद्रशासित प्रदेशातून गेली. अडवाणी रामलीला मैदानातील सभेपूर्वी गाझियाबाद येथे होणाऱ्या सभेत बोलणार आहेत.

First Published: Sunday, November 20, 2011, 11:26


comments powered by Disqus