अडवाणींची रथयात्रा केवळ बडबड - काँग्रेस - Marathi News 24taas.com

अडवाणींची रथयात्रा केवळ बडबड - काँग्रेस

झी २४ तास वेब टीम, नवी दिल्ली 
 
भ्रष्टाचाराच्या मुद्यावर भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांनी केंद्रातीर आघाडी सरकारवर केलेल्या टीकेला काँग्रेसने चोख प्रत्युत्तर दिलं आहे. अडवाणींची रथयात्रा केवळ बडबड आहे. पक्षात आपले अस्तित्व टिकवून ठेवण्याचा अडवाणी केविळवाणी प्रयत्न आहे, असे काँग्रेसने म्हटले आहे.
 
भ्रष्टाचाराविरुद्ध ठोस पाऊल भाजपने नव्हे तर काँग्रेसनेच उचललेले आहे, हे सत्य अडवाणी नाकारू शकत नाहीत, असे काँग्रेसचे प्रवक्ते अभिषेक मनु सिंघवी म्हणाले. कथित भ्रष्टाचारविरोधी यात्रा ही केवळ ‘उक्ती’ आहे.त्यात ‘कृती’चा लवलेशही दिसत नाही, असेही ते म्हणाले.
 
दरम्यान, अडवाणींनी पंतप्रधान बनण्याचे दिवास्वपने पाहू नये, असे भाकपने म्हटले आ जनचेतना रथयात्रा ही पंतप्रधानपदासाठी दावा करण्याच्या उद्देशाने अडवाणींची प्रतिमा उजळण्याचा प्रयत्न आहे, असे ए. बी. बर्धन म्हणाले.

First Published: Monday, November 21, 2011, 03:19


comments powered by Disqus