पूर्वेकडील राज्यांमध्ये भूकंपाचे धक्के - Marathi News 24taas.com

पूर्वेकडील राज्यांमध्ये भूकंपाचे धक्के

झी २४ तास वेब टीम, गुहाहटी/भूज 
 
भारताच्या पूर्वेकडील राज्यांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले.
 
गुजरातबरोबर कोलकाता, असाम या राज्यांत काही ठिकाणी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. गुजरातच्या सौराष्ट्र भागात रात्री १0.४८ मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता ५.३ रिश्टर इतकी होती. या भूकंपामुळे घबराटीचे वातावरण निर्माण झाले. जुनागढपासून ३८ किलोमीटर दक्षिणेला भूजजवळ या भूकंपाचे केंद्र आहे. गुजरातमधील राजकोट, पोरबंदर, भावनगर आणि सुरत, अहमदाबाद या शहरांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले.
 
दरम्यान,  म्यानमार आणि बांग्लादेशमध्ये सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता ५.९ रिश्टर इतकी होती.या भूकंपाचा केंद्रबिंदू मणिपूरची राजधानी इम्फाळपासून १३० किमीवरील म्यानमार होते.

First Published: Monday, November 21, 2011, 05:07


comments powered by Disqus