गोंधळानंतर लोकसभेचे कामकाज तहकूब - Marathi News 24taas.com

गोंधळानंतर लोकसभेचे कामकाज तहकूब

झी २४ तास वेब टीम,  नवी दिल्ली
 
संसदेचं हिवाळी अधिवेशन अपेक्षेप्रमाणे वादळी झालं आहे. केंद्रीय गृहमंत्री पी चिदंबरम यांच्या राजीनाम्याची मागणी करत लोकसभेत विरोधकांनी गोंधळ घातला. त्यामुळं लोकसभेचे कामकाज तहकूब करण्यात आलं.
 
चिदंबरम यांच्यावर एनडीएनं बहिष्कार घालला. महागाई आणि उत्तरप्रदेश विभाजनावर चर्चा करण्याच्या मागणीचा मुद्दाही अधिवेशनात गाजला. विरोधकांच्या गोंधळमुळं लोकसभेचे कामकाज तहकूब करण्यात आलं. केंद्रीय गृहमंत्री पी चिदंबरम यांच्या राजीनाम्याची मागणी करत लोकसभेत विरोधकांचा गोंधळ घातला. राज्यसभेचं कामकाज उद्यापर्यंत तहकूब करण्यात आलं आहे.  तर लोकसभेचे १२ वाजेपर्यंत कामकाज तहकूब करण्यात आलं होतं. १२नंतर लोकसभा सुरू झाल्याने पुन्हा गोंधळ घातला.
 
टू जी घोटाळ्यात तत्कालिन अर्थमंत्री  चिदंबरम यांचं नाव आलं. त्यातच अर्थमंत्रालयाच्या चिठ्ठ्यांमुळं चिदंबरम वादाच्या भोव-यात सापडलेत.  हा मुद्दा करुन चिदंबरम यांच्या राजीनाम्याची मागणी राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं केली.

First Published: Tuesday, November 22, 2011, 10:32


comments powered by Disqus