रूपयाची ५२.७३ निचांकी घसरण - Marathi News 24taas.com

रूपयाची ५२.७३ निचांकी घसरण

झी २४ तास वेब टीम, नवी दिल्ली
 
अमेरिकन एका डॉलरच्या तुलनेत रूपयाची ५२.७३ ने घसरण झाली. ही सर्वात निचांकी घसरण आहे. रूपयाच्या मूल्य घसरणीने महागाई वाढण्याची शक्यता आहे.
 
आंतरराष्ट्रीय बॅंकेच्या विदेशी वित्तीय पेचामुळे बाजार कोसळला. त्यामुळे सुरूवातीला बाजारात गिरावट दिसून आली. रूपयाचे मूल्य ३५ पैशांनी कमी झाले.  याता परिणाम होऊन रूपयाची ५२.५० ने घसरण झाली. आता पुन्हा रूपयाच्या मूल्य घसरणीने  एका डॉलरच्या तुलनेत रूपया ५२.७३ झाला आहे.
 
रुपयाने दोन वर्षांतील नीचांकी मूल्य गाठल्यामुळे , तसेच युरोपतील वित्तीय पेचाबरोबर अमेरिकेची अर्थव्यवस्था मंदावण्याच्या भीतीने शेअर बाजार गडगडला. रुपयाचे मूल्य घसरण्याचा परिणाम आयातदारांवर झाला आहे. आयसीआयसीआय बँक , इन्फोसिस , रिलायन्स इंडस्ट्रीज , एचडीएफसी बँक , एचडीएफसी , टाटा मोटर्स, आयटीसी , स्टेट बँक , टीसीएस , भारती एअरटेल आणि ओएनजीसी यांचे बाजारातील घसरणीत योगदान तीन अंशांपेक्षा अधिक होते.

First Published: Tuesday, November 22, 2011, 10:37


comments powered by Disqus