देहरादून एक्स्प्रेसच्या आगीत ७ मृत्युमुखी - Marathi News 24taas.com

देहरादून एक्स्प्रेसच्या आगीत ७ मृत्युमुखी

झी २४ तास वेब टीम, देहरादून
 
हावड्याहून देहरादूनला जाणा-या देहरादून एक्स्प्रेसच्या दोन डब्यांना भीषण आग लागली. आगीत बी-1 आणि बी-2 हे दोन एसी कोच जळून खाक झालेत. या अपघातात सात प्रवाशी मृत्युमुखी  झालेत. यात एक महिला आणि मुलीला जीव गमवावा लागला.
 
आग कशामामुळं लागली हे मात्र अद्यापपर्यंत कळू शकलेलं नाही. झारखंडमधील निमियाघाट आणि पारसनाथ रेल्वे स्टेशनदरम्यान चालत्या गाडीत आग लागली. पहाटे अडीच वाजताची ही घटना आहे. आग लागल्याचं कळताच एक्स्प्रेस थांबवण्यात आलीये.
 
या आगीत  सात प्रवाशांसलह एक महिला आणि मुलीचा भाजून मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. अर्पिता आणि अनुमिता आशी त्यांची नावे आहेत. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता असल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली. दरम्यान जळालेले डब्बे एक्स्प्रेसपासून वेगळे करण्यात आलेत.

First Published: Tuesday, November 22, 2011, 10:50


comments powered by Disqus