इशरतला एसआयचीटीची क्लीन चीट नाही - Marathi News 24taas.com

इशरतला एसआयचीटीची क्लीन चीट नाही

झी 24 तास वेब टीम, मुंबई
 
इशरत जहाँ अतिरेकी नसल्याचं स्पेशल इन्वेस्टिगेटिव्ह टीमने गुजरात उच्च न्यायालयाला सादर केलेल्या रिपोर्टमध्ये म्हटलं नसल्याचा दावा माजी गृह सचिव जी.के.पिल्लई यांनी मंगळवारी केला. पण त्याचवेळेस गुजरात पोलिसांनी केलेले एनकाऊंटर हे बनावट असल्याचंही पिल्लई म्हणाले. न्यायाधीश जयंत पटेल आणि न्यायाधीश अभिलाषा कुमारी यांच्या खंडपीठाने 21 नोव्हेंबर रोजी माजी पोलिस महासंचालक डी.जी.वंजारा यांच्यासह एनकाऊंटर करणाऱ्या पोलिसांवर कलम 302 अन्वये खुनाचा गुन्हा नोंदवण्याचे निर्देश पोलिसांना दिले.
 
 







स्पेशल इन्वेस्टिगेटिव्ह टीमने आपल्या रिपोर्टमध्ये इशरत आणि इतर तिघांना एनकाऊंटरची तारिख 15 जून 2004 च्या अगोदरच मारण्यात आल्याचं म्हटलं आहे. खंडपीठाने एनकाऊंटरमध्ये सहभागी असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांविरोधात कलम 302 अन्वये एफआयआर दाखल करण्याचे आदेश जारी केले आहेत. आर.आर.वर्मा यांच्या नेतृत्वाखालील स्पेशल इन्वेस्टिगेटिव्ह टीमने शुक्रवारी कोर्टात रिपोर्ट सादर केला.
 
मुंब्र्याच्या इशरत जहाँ तसेच तिचा मित्र जावेद शेख आणि दोन संशयित पाकिस्तानी नागरिक यांना गुजरात पोलिसांनी 15 जून 2004 रोजी एक एनकाऊंटरमध्ये ठार मारलं होतं. इशरतची आई शमिमा कौसर आणि जावेद शेखचे वडिल गोपीनाथ पिल्लई यांनी एनकाऊंटरच्या सत्यतेविषयी तपास करण्यात यावा यासाठी याचिका दाखल केली होती. त्यानंतर गुजरात उच्च न्यायालयाने तपासासाठी स्पेशन इन्वेस्टिगेटिव्ह टीमची नियुक्ती केली होती.

First Published: Tuesday, November 22, 2011, 11:47


comments powered by Disqus