Last Updated: Tuesday, November 22, 2011, 12:40
झी 24 तास वेब टीम, मुंबई भारतात पहिलं सॅटेलाईट चॅनेल सुरु करणारे झी उद्योग समुहाचे सुभाष चंद्र यांना सोमवारी 2011 सालचं इंटरनॅशनल एमी डायरेक्टोरेट ऍवार्डने सन्मानित करण्यात आलं. सुभाष चंद्र डायरेटक्टोरेट ऍवार्ड मिळवणारे पहिले भारतीय आहेत. एका अर्थाने सुभाष चंद्रांनी इतिहास घडवला. न्यु यॉर्क शहरातील हिल्टन न्यु यॉर्क मध्ये एका शानदार सोहळ्यात 39 व्या इंटनरनॅशनल एमी ऍवार्डचं वितरण करण्यात आलं.
सुभाषचंद्र हे एक द्रष्टे उद्योगपती असून त्यांनी भारतीय टेलिव्हिजन इंडस्ट्रीवर पहिली खाजगी वाहिनी सुरु करून त्यांनी ठसा उमटवला आहे असं द इंटरनॅशनल ऑफ टेलिव्हिजन आर्ट्स अँड सायन्सेसच्या ब्रूस पैसनेर म्हणाले. भारताने साऱ्या विश्वाचं लक्ष वेधून घेतलं आहे आणि हा पुरस्कार प्राप्त करणारा पहिला भारतीय मी माझा सन्मान समजतो असं सुभाष चंद्र आपल्या भाषणात म्हणाले. सिटीग्रुपचे अध्यक्ष रिचर्ड पारसन्स आणि एमी ऍवार्ड विजेती अभिनेत्री आर्ची पंजाबी यांनी सुभाष चंद्रांना हा पुरस्कार प्रदान केला.
First Published: Tuesday, November 22, 2011, 12:40