Last Updated: Tuesday, March 13, 2012, 15:24
झी 24 तास वेब टीम, मुंबईतुमच्या चेहऱ्यावर जर नकोशा वाटणाऱ्या सुरकुत्यांनी जाळं विणायला सुरूवात केली असेल, तर केळी खाणं सुरू करा. केळ्यामध्ये असणाऱ्या पोषकतत्त्वांमुळे सगळ्या फळांमध्ये केळं हे सर्वांत लाडकं फळ आहे .
केळं शरीराला लोह तर पुरवतंच पण त्याशिवाय स्किन फ्रुटचंही काम करतं. केळी खाल्ल्याने त्वचा जितकी तजेलदार दिसते, तितकीच त्याची पेस्टही उपयोगी आहे, असं एक्सपर्ट्सचं मत आहे.
खरंतर रेडीमेड फ्रुट फेशियल पेस्ट बाजारात मिळतात. पण ज्या लोकांना ताज्या फळांनी फेशियल करायला आवडतं, त्यांच्यासाठी ताज्या फळांच्या फेशियलमध्ये आम्ही पपई आणि केळी जास्त वापरतो. त्यामुळे चेहऱ्यावरचा थकवा ताबडतोब निघून जातो आणि चेहरा फ्रेश दिसायला लागतो. तसंच, सुरकुत्याही कमी होतात. असं काही ब्युटिशियन्सचं म्हणणं आहे.
केळ्याची ताजी पेस्ट घरच्या घरीही बनवता येऊ शकते. ती बनवण्यासाठी १ पिकलेलं केळं १ चमचा मधात मिसळून घ्यावं. ते कुस्करुन चेहऱ्याला आणि मानेला लावून पंधरा मिनीटं ठेवून द्यावं. केळ्याच्या गरामध्ये ऑलिव्ह ऑईल मिसळून लावल्यास सुरकुत्या कमी होतात.
पिकलेल्या केळ्याचा गर आणि खोबरेल तेलाचं मिश्रण घेवून हाताच्या त्वचेवर लावलं की हातावर सुरकुत्या येत नाहीत. हेच मिश्रण शरीराच्या इतर अवयवांना लावून अंगावररील सुरकुत्या टाळता येतील.
First Published: Tuesday, March 13, 2012, 15:24