डासांची कॉइल सिगारेटपेक्षा ‘डेंजर’ - Marathi News 24taas.com

डासांची कॉइल सिगारेटपेक्षा ‘डेंजर’

झी 24 तास वेब टीम.
डासांना मारण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कॉइल या सिगारेटपेक्षा जास्त जीवघेण्या आहेत. आपण सिगारेट पीत नाही, पण घरामध्ये डासांपासून बचाव करण्याकरता कॉइलचा वापर करत असल्यास त्याच्या धुरापासून आपल्या फुप्फुसांना इजा पोहचू शकते. नुकताच मलेशियामध्ये या संदर्भात एक अभ्यास करण्यात आला. वायु प्रदूषणामुळे मानवी जीवनावर होणारे परिणाम याबाबत जागरूकता होणं गरजेचं आहे.

घरात वापरण्यात येणाऱ्या कॉइलमुळे निर्माण होणारा धूर आपल्या आरोग्यास हानिकारक असल्याचा निष्कर्ष यात काढण्यात आला. एका कॉइलमधून निघणारा धूर हा 100 सिगारेट इतका बरोबरीचा असतो, आणि यामुळे लोकांचा आरोग्य बिघडू शकते, असे संशोधकांचा म्हणणं आहे. डासांपासून वाचण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या एका कॉइलचा धूर 100 सिगारेटचा धूराइतका धोकादायक असल्याने त्यामुळे फुप्फुसांवर त्याचा विपरित परिणाम होण्याची शक्यता असल्याचे चेस्ट रिसर्च फांउडेशनचा संचालकांचा म्हणंण आहे.कॉइलचा धूर हा मेंदूसाठी ‘स्लो पॉईझन’ ठरू शकतो. यामुळे लहान मुलांचा मेंदूवर आणि खासकरून त्यांचा स्मरण शक्तीवर यांचा जास्त प्रभाव पडण्याची शक्यता आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे.

First Published: Monday, September 26, 2011, 12:09


comments powered by Disqus