शिवसेना उमेदवारावर दिल्लीत हल्ला - Marathi News 24taas.com

शिवसेना उमेदवारावर दिल्लीत हल्ला

www.24taas.com, नवी दिल्ली 
 
 
दोन दिवसांपूर्वी दिल्लीत भाजपच्या उमेदवाराची हत्या केल्याची घटना असताना आज  शिवसेनेच्या उमेदवारावर  हल्ला करण्यात आल्याने राजकीय वातावरण  तापले आहे. हा हल्ला चार जणांच्या टोळीने केल्याचे सांगण्यात येत आहे.
 
 
दिल्ली महानगरपालिकेत नगरसेवकपदासाठी निवडणूक लढविणाऱ्या  शिवसेनेचे उमेदवार सुनील कुमार यांच्या चार जणांनी आज सकाळी हल्ला केला. या हल्ल्यात ते जखमी झालेत. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दिल्लीतील रोहिणी भागातून वॉर्ड क्रमांक २१ मधून ते निवडणूक लढवीत आहेत. आज सकाळी बाजारात जात असताना अज्ञात चार जणांनी त्यांच्यावर हल्ला केल्याचे सुनील कुमार यांनीच सांगितले.
 
भाजपचे उमेदवार जयप्रकाश यांची हत्या झाल्याच्या प्रकरणानंतर दोनच दिवसांत शिवसेनेच्या उमेदवारावर हल्ला झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यामुळे दिल्लीतील महानगरपालिकेसाठी राजकारण तापू लागल्याचे चित्र आहे. दिल्ली महापालिकेसाठी १५ एप्रिलला निवडणूक होत आहे.

First Published: Thursday, April 12, 2012, 15:20


comments powered by Disqus