Last Updated: Wednesday, November 23, 2011, 09:59
झी २४ तास वेब टीम, नवी दिल्ली २ जी स्पेक्ट्रम घोटाळ्याप्रकरणी सुप्रीम कोर्टाने ५ कॉर्पोरेट अधिकाऱ्यांना जामीन मंजूर केलाय. साडेपाच लाखांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर या अधिकाऱ्यांना जामीन मंजूर करण्यात आलाय. यूनीटेकचे एमडी संजय चंद्रा, स्वान टेलिकॉमचे डायरेक्टर विनोद गोयंका, रिलायंस एडीएजीचे अधिकारी गौतम दौषी, हरि नायर आणि सुरेंद्र पिपारा या अधिकाऱ्यांना जामीन मंजूर करण्यात आलाय.
या आधीही २जी घोटाळ्याचा खटला सुरु असलेल्या कनिष्ठ न्यायालयाने या अधिका-यांचा जामिन फेटाळला होता. मात्र आता सुप्रीम कोर्टाच्या निर्णयांने या पाचही कार्पोरेट ऑफिशियलस्ना दिलासा मिळालाय. सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय सीबीआयला झटका मानला जातोय. कारण सीबीआयने या पाचही अधिकाऱ्यांच्या जामिनाला विरोध केला होता. या अधिकाऱ्यांना जामीन मिळाल्यामुळे ए. राजा आणि कनिमोळींना जामीन मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
First Published: Wednesday, November 23, 2011, 09:59