Last Updated: Thursday, April 19, 2012, 09:28
www.24taas.com, उडिसा 
भारताच्या महत्वाकांक्षी अणवस्त्रवाहू अग्नि - ५ क्षेपणास्त्राची आज यशस्वी चाचणी घेण्यात आली. आज पहाटे ओरिसातल्या व्हीलर्स बेटावरून अग्नि - ५ क्षेपणास्त्र आकाशात झेपावलं. तब्बल पाच हजार किलोमीटरचा पल्ला गाठण्याची या क्षेपणास्त्राची क्षमता आहे.
अग्नि - ५ मुळे भारत आता अमेरिका, रशिया, चीन आणि फ्रान्स या देशांच्य़ा पक्तींत जाऊन बसला आहे. आंतरखंडीय देशांकडून होणारे हल्ले परतावून लावण्यासाठी या क्षेपणास्त्राचा मोठा उपयोग होणारं आहे. १७ मीटर लांब आणि दोन मीटर रूंदी असलेल्या या क्षेपणास्त्राचं वजन ५० टन इतकं आहे. एक टन अणवस्त्र वाहून नेण्याची त्याची क्षमता आहे. अग्नि - ५चं खास वैशिष्ट म्हणजे केवळ २० मिनिटांत लक्ष्य भेदण्यास हे क्षेपणास्त्र सक्षम आहे.
या क्षेपणास्त्राची चाचणी ही यशस्वी झाली आहे. या क्षेपणास्त्राची चाचणी बुधवारी संध्याकाळी सात ते आठ यावेळेमध्ये होणार होते. पण वातावरण योग्य नसल्याने ही चाचणी पुढे ढकलण्यात आली होती. परीक्षण स्थळावर जोरदार पाऊस पडत होता. त्याप्रमाणेच वीजाही कडकडत होत्या. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने याची चाचणी आज पहाटे घेण्यात आली.
First Published: Thursday, April 19, 2012, 09:28