Last Updated: Thursday, April 19, 2012, 14:06
www.24taas.com 
'हम है डान्स के बाप' अहो हे आम्ही नाही तर लिटील मास्टर्स म्हणत आहेत. डीआयडीचा नवा सिझन अर्थातच डीआयडी लिटील मास्टर्स लवकरच आपल्या भेटीला येणार आहेत. नुकतीच या लिटील मास्टर्सची ऑडिशन्स पार पडली. आणि यात चिमुरड्यांनी अफलातून परफॉर्मन्स देखील दिला आहे.
स्टंट्स, एरिअल अँक्ट, स्केट्स, चित्तथरारक परफॉर्मन्सने डीआयडीचा मंच गाजवायला लिटील मास्टर्स सज्ज झाले आहेत. नुकतीच डीआयडी लिटील मास्टर्सची ऑडिशन राऊंड पार पडली आहे. दिल्लीच्या स्रीष्टी जयस्वालनं स्केटिंग डान्स सादर करुन परीक्षकांची वाहवा मिळवली. तर दिल्लीच्याच अक्षता मुदगलचा रिंगा डान्स म्हणजे केवळ लाजवाब. कोलकाताच्या ओमने तर जबरदस्त स्टंट्स सादर करत परीक्षकांना आश्चर्यचकीत केलं.
हम भी कुछ कम नहीं, असं म्हणत लिटील मास्टर्सनी कसून तयारी केल्याचं ऑडिशन राऊंडमध्येच दिसून आलं आहे. त्यामुळे डीआयडी लिटील मास्टर्सचा हा सिझन नक्कीच धमाकेदार असणार यात शंकाच नाही..
First Published: Thursday, April 19, 2012, 14:06