आजचा सेंसेक्स - Marathi News 24taas.com

आजचा सेंसेक्स


www.24taas.com, मुंबई
 
मुंबई शेअरबाजाराचा सेन्सेक्स आज 17 हजार 503 अंशांवर बंद झाला. त्यात 111 अंशाची वाढ झाली. तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा निफ्टी आज 5हजार 332 अंशांवर बंद झाला. त्यात 32 अंशांची वाढ झाली.
 
आज सकाळी बाजार वरच्या पातळीवर उघडला. सकाळच्या सत्रात बाजार संथ गतीनं वाढत होता. दुपारच्या सत्रात बाजारानं 17 हजार 500 ची उच्चांकी पातळी गाठली. मात्र, त्यानंतर रिलायन्सचे स्टॉक्स घसरल्यामुळे बाजारात घट पहायला मिळाली. शेवटी बाजार तुलनेनं वरच्या पातळीवर बंद झाला. आज एचडीएफसी बॅंक, टाटा मोटर्स आणि सन फार्मास्युटीकलन उच्चांकांची नोंद केली. व्यवसाय बंद करण्याची इच्छा असणा-या टेलेकॉम कंपन्यांसाठी वेगळ्या एक्झिट पॉलिसीची गरज नसल्याचं टेलेकॉम ऑथॉरिटीनं स्पष्ट केल्यानंतर टेलेकॉमचे स्टॉक्स संमिश्र होते.
 
कॅपिटल गुड्सचे स्टॉक्स वाढलेले होते. रिझर्व्ह बॅंकेनं वार्षिक पतधोरणात रेपो रेट कमी केल्यामुळे व्याजदराबाबत संवेदनशील असणा-या बॅंका आणि एटो स्टॉक्स वाढले होते. आज कोल इंडिया, एचडीएफसी, टाटा मोटर्स, मारूती सुझुकी, हिरो मोटोकॉर्प या कंपन्यांचे शेअर्स वधारलेत तर भेल, हिंडाल्को, गेल, विप्रो, आणि रिलायन्स या कंपन्यांचे शेअर्स घसरलेत.

First Published: Thursday, April 19, 2012, 22:51


comments powered by Disqus