तमिळनाडूत 'डॅम ९९९'वर बॅन - Marathi News 24taas.com

तमिळनाडूत 'डॅम ९९९'वर बॅन

झी २४ तास वेब टीम, नवी दिल्ली 
 
'डॅम ९९९' या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याचा निर्णय तमिळनाडू सरकारने आज घेतला.
 
 
चित्रपटावर बंदी घातल्याने तमिळनाडूतील सर्व चित्रपट गृह मालकांनी हा चित्रपट दाखविण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. 'डॅम ९९९' हा चित्रपट तमिळनाडू आणि केरळ सीमेवर ११६ वर्षे जुने  असलेल्या मुल्लापेरियार धरण कसे पडले यावर आधारित आहे.
 
 
'डॅम ९९९' हा हॉलीवूडमध्ये बनविण्यात आलेला चित्रपट असून, या दोन्ही राज्यांमध्ये वाद वाढू नये यासाठी त्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे जयललिता यांनी सांगितले.
 
 
राजकीय नेते शशी थरूर यांनी या बंदीला विरोध दर्शविला आहे. मी अद्याप हा चित्रपट पाहिलेला नाही. धरण हा एकमेव मुद्दा चित्रपटावर बंदी घालण्यासाठी योग्य असू शकत नाही. राजकीय उद्देशातून या चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे, असे  थरूर म्हणाले.
 
 

First Published: Thursday, November 24, 2011, 08:12


comments powered by Disqus