अण्णा आता लढणार दूध भेसळीविरोधात... - Marathi News 24taas.com

अण्णा आता लढणार दूध भेसळीविरोधात...

www.24taas.com, नवी दिल्ली
 
देशभरात दूधाच्या काळ्या धंद्याचा पर्दाफाश करण्याची जोरदार तयारी सुरू आहे. दूध भेसळ आणि दूधाचा काळाबाजार करणाऱ्यांविरोधात हजारो दूध उत्पादकांनी दिल्लीतल्या जंतरमंतरवर धरणं आंदोलन सुरू केला आहे.
 
२४ एप्रिलपर्यंत सरकारनं आपल्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दूध उत्पादकांनी दिला आहे. दूध उत्पादकांच्या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळतो आहे.
 
अनेक संघटना तसंच टीम अण्णांनीसुद्धा दूध उत्पदकांच्या लढ्याला पाठिंबा दर्शवला आहे. देशभरातून हजारो शेतकरी जंतरमंतरवर दाखल झाले आहेत. आता सरकार या आंदोलनावर कोणती भूमिका घेतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
 

First Published: Saturday, April 21, 2012, 18:37


comments powered by Disqus