दिल्ली भेटीत ठरल, राज्यमंत्रिमंडळाचा विस्तार.. - Marathi News 24taas.com

दिल्ली भेटीत ठरल, राज्यमंत्रिमंडळाचा विस्तार..

www.24taas.com, नवी दिल्ली
 
राज्यमंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होण्याची चिन्हे आहेत. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना दिल्लीभेटीत हायकमांडने विस्ताराला परवानगी दिल्याचं मानलं जात आहे. तसंच बऱ्याच काळ रखडलेल्या महामंडळावरच्या नियुक्त्यांची यादीही मुख्यमंत्र्यांनी सोनियांकडे सोपवल्याचे समजते.
 
मुख्यमंत्री पृथ्वीराज  चव्हाण  काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेण्यासाठी दिल्लीला डेरेदाखल झाले होते. या भेटीत मुख्यमंत्री मुंबई शहर अध्यक्ष निवडीबाबत चर्चा करण्याची शक्यता होती. चव्हाण  आणि सोनिया यांच्या भेटीबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू होती. विदर्भ आणि मराठवाड्यातील नाराज आमदारांनी मुख्यमंत्र्यांवर नाराजी व्यक्त करीत नाराज आमदारांनी बैठक  घेतली होती. यावेळी मुख्यमंत्री चव्हाण हटावचा नाराही दिला.
 
दरम्यान, ठाण्यात शिवसेनेशी हात मिळवणी केल्याने राष्ट्रवादीने काँग्रेसवर आगपाखड केली आहे. आघाडी तोडण्याची भाषा करताना काँग्रेसला अल्टीमेटन दिला. यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी आम्हाला गृहीत धरू नका, असे बजावले होते. त्यानंतर गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी काँग्रेसला तंबीच दिली आहे. त्यामुळे आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता जास्त आहे. या सर्वबाबींबाबत सोनियांशी चर्चा करण्याची शक्यता आहे.
 
 
 
 
 

First Published: Saturday, April 21, 2012, 22:15


comments powered by Disqus