Last Updated: Monday, April 23, 2012, 16:19
www.24taas.com, बेळगाव 
कर्नाटक सरकारनं मराठी भाषिकांना एक सुखद धक्का दिला आहे. कर्नाटकच्या भाजप सरकारनं राज्यभरात शिवजयंती साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी शिवजयंती साजरी करायची असल्यास राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागायची.
मात्र आता थेट शिवजयंती साजरी केली जाणार आहे. शासकीय पातळीवर ही शिवजयंती बेळगाव शहरातल्या शिवाजी उद्यानात साजरी होत असून त्यासाठी मुख्यमंत्री सदानंद गौडांची खास उपस्थिती आहे. शिवजयंतीच्या शासकीय सोहळ्यासाठी तब्बल ८ लाख अनुदानही मंजूर करण्यात आलं आहे.
मात्र या निर्णयामुळे मराठी बांधव सुखावला असला तरी यामागे काही राजकीय हेतू तर नाही ना अशी शंकाही व्यक्त केली जाते आहे. ४० लाख मराठी मतांवर डोळा ठेऊन भाजप सरकारनं हा निर्णय घेतल्याचा आरोप होतो आहे. मराठी भाषिकांवर अन्याय करताना शिवाजी महाराज आठवत नाहीत का असा सवालही या निमित्तानं विचारला जातो आहे.
First Published: Monday, April 23, 2012, 16:19