Last Updated: Monday, April 23, 2012, 16:47
www.24taas.com, नवी दिल्ली 
लेफ्नंट जनरल बिक्रम सिंग यांचा लष्कराचे भावी प्रमुख होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. बिक्रम सिंग यांच्या लष्करप्रमुखपदी नियुक्तीला आक्षेप घेणारी याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली आहे. बिक्रम सिंग यांची नियुक्ती कुठल्या आधारांवर करण्यात आली, यासंदर्भातली कागदपत्रं सादर करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टानं सरकारला दिले होते.
त्याचबरोबर बिक्रम सिंगांची नियुक्ती करण्यापूर्वी कॅबिनेट कमिटीनं त्यांच्यावरचे आरोप विचारात घेतले होते का, यासंदर्भातला निष्कर्ष सुप्रीम कोर्टानं त्या कागद पत्रांवरुन काढला. त्यानंतर सुप्रीम कोर्टानं ही याचिका फेटाळली आहे.
२००१ साली काश्मीरमध्ये झालेल्या एका बनावट एन्काऊन्टर प्रकरणात बिक्रम सिंग यांचा समावेश होता, तसंच २००८ मध्ये लैगिंक शोषण करणाऱ्या अधिकाऱ्यांवर बिक्रम सिंग यांनी कारवाई केली नव्हती, असे आरोप बिक्रम सिंग यांच्यावर आहेत. तर त्यांच्या पदोन्नतीबद्दलही याचिकेच आक्षेप घेण्यात आला होता.
First Published: Monday, April 23, 2012, 16:47