'राम सेतू'साठी विहिंप आक्रमक - Marathi News 24taas.com

'राम सेतू'साठी विहिंप आक्रमक

www.24taas.com, कोइंबतूर
 
राम सेतूला राष्ट्रीय स्मारक घोषित करण्यात यावं, यासाठी विश्व हिंदू परिषद आता सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावणार आहे. संघटनेने यासाठी सरकारच्या हिंदूद्वेषाचा निषेध केला आहे.
 
“केंद्र सरकार अल्पसंख्यांकांच्या मर्जीसाठी सर्व उपाय करत असते. त्यांच्या हिताचं रक्षण करते. मग, अशा सरकारने हिंदूंच्या भावनेचाही आदर करायला हवा.” असं विहिंपचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष राघव रेड्डी पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
 
राम सेतूला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा मिळावा, यासाठी विहिंप मद्रास हाय कोर्ट आणि सुप्रीम कार्टात याचिका दाखल करणार आहे. या मुद्दयावर सरकारवर दबाव आणण्यासाठी विहिंप ठिकठिकाणी कार्यक्रम आयोजित करणार आहे.

First Published: Monday, April 23, 2012, 17:22


comments powered by Disqus