Last Updated: Monday, April 23, 2012, 17:43
www.24taas.com, लंडनतुम्ही ३० वर्षांपेक्षा अधिक वयाचे असाल आणि तुम्ही इतरांशी वादविवाद करीत असाल तर ते तुमच्या आरोग्यासाठी चांगले असल्याचे एका अभ्यासातून समोर आले आहे.
लिंकॉन विद्यापीठाच्या अभ्यासकांनी हा अद्भूत शोध लावला आहे. कमी सक्रीय व्यक्तींच्या बाबतीत हा नियम तंतोतंत लागू पडल्याचेही अभ्यासकांनी सांगितले आहे. निष्क्रिय व्यक्तिंना असे वाटते की, आपण आपल्या कुटुंबियांशी किंवा पत्नीशी वादविवाद घातला किंवा भांडण केलं तर त्याचा आरोग्यावर चांगला परिणाम होतो.
यामुळे लोकांच्या राहणीमानाचा अभ्यास करण्यासाठी उपयोगी ठरणार असल्याचे या अभ्यासकांपैकी एक असलेल्या डॉ. रिचर्ड किगन यांनी सांगितले आहे.
First Published: Monday, April 23, 2012, 17:43