Last Updated: Thursday, November 24, 2011, 16:52
झी २४ तास वेब टीम, मुंबई माओवादी नेते कोटेश्वर राव उर्फ किशनजी हे सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत ठार झाले. ही चकमक पश्चिम बंगालमधील पश्चिम मिदनापोर जिल्ह्यातील झगराम भागातील खुशबनी इथे झाली. या महिन्याच्या सुरवातीला माओवादी आणि पश्चिम बंगाल सरकारमध्ये शस्त्रसंधीची बोलणी फिस्कटली होती हे लक्षात घेण्याजोगं आहे. किशनजी यांचा मृतदेह एके ४७ रायफल सोबत जंगलात सापडल्याच्या वृत्ताला सुरक्षा दलांनी दुजोरा दिला आहे. किशनजी आणि त्याच्या जवळची महिला साथीदार काल सुरक्ष दलाला चकवून पळून गेल्याच्या बातम्या प्रसिध्द झाल्या होत्या.
सुरक्षा दलांनी किशनजींच्या सुरक्षेसाठी तैनात बचाव पथकाच्या पाच माओवादी सदस्यांना अटक केली त्याचवेळेस संयुक्त फौजा सर्तक झाल्या. सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार संपूर्ण परिसराची नाकेबंदी करण्या अगोदरच किशनजी आणि सूचित्रा झारखंडला पळून गेले. याआधी पश्चिम मिदनापूर जिल्ह्यातील लखनपूरच्या जंगलात २०१० साली झालेल्या चकमकीत किशनजी जखमी झाला होता. गेली वर्षभर सूचित्रा आणि किशनजी एकत्र राहत असल्याची माहिती पोलिस दलांना मिळाली होती.
First Published: Thursday, November 24, 2011, 16:52