सिंघवींच्या 'त्या' सीडीचं संसदेत काय होणार? - Marathi News 24taas.com

सिंघवींच्या 'त्या' सीडीचं संसदेत काय होणार?

www.24taas.com, नवी दिल्ली
 
काँग्रेस नेते अभिषेक मनु सिंघवी यांच्या 'त्या' सीडी प्रकरणाचे पडसाद आज संसदेत उमटण्याची शक्यता आहे. विरोधकांना आयती संधी मिळू नये यासाठी सिंघवी यांनी आधीच संसदेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदाचा आणि काँग्रेसच्या प्रवक्तेपदाचा राजीनामा दिला आहे.
 
मात्र यामुळं विरोधकांच्या आक्रमकतेची धार कमी होईल अशी शक्यता सध्या तरी दिसत नाही. सीडीप्रकरणी सिंघवी यांनी संसदेत स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी भाजपनं केली आहे. त्यामुळं कामकाजाच्या सुरूवातीलाच काँग्रेसला सिंघवीच्या सीडी प्रकरणावरून टार्गेट करण्याची शक्यता आहे.
 
काँग्रेस यापूर्वीच अनेक प्रकरणांत अडचणीत असल्यानं आता या सीडीप्रकरणावरून भाजप काँग्रेसला खिंडीत गाठण्याची कोणतीही संधी सोडणार  नाही. काँग्रेसचे प्रवक्ते अभिषेक मनु सिंघवी यांना वादग्रस्त सीडीप्रकरण हे चांगलच भोवणार असं दिसतं आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा आजपासून सुरु होत असताना त्याच्या पूर्वसंध्येला सिंघवी यांनी स्थायी समिती आणि काँग्रेस प्रवक्तेपदाचा राजीनामा दिला आहे.
 
 
 

First Published: Tuesday, April 24, 2012, 11:00


comments powered by Disqus