Last Updated: Tuesday, April 24, 2012, 16:01
www.24taas.com, रांची 
छत्तीसगडमधील सुकमाचे कलेक्टर अलेक्स मेनन यांची अद्याप सुटका झालेली नाही. त्यांच्या मध्यस्थीसाठी नक्षलवाद्यांनी सुचवलेल्या तीन नावांपैकी दोघांनी मध्यस्थीस नकार दिल्यानं छत्तीसगड सरकार आणि नक्षलवाद्यांमध्ये अद्याप तोडगा निघालेला नाही.
ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण आणि सीपीआयचे माजी आमदार मनीष कुंजम यांनी मध्यस्थीस नकार दिला आहे. तर माजी आयएएस अधिकारी बी.डी.शर्मा यांनी अजून आपले म्हणणे कळवलेलं नाही. नक्षलवाद्यांनी सरकारला दिलेली डेडलाईन उद्या संपणारा आहे. त्यामुळं आज अखेरच्या दिवशी छत्तीसगड सरकारला धावपळ करावी लागणार आहे.
छत्तीसगडमधल्या सुकमा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अँलेक्स पॉल मेनन यांचे अपहरण करून नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलांना आव्हान दिलं आहे. नक्षलग्रस्त दंतेवाडा जिल्ह्याचं विभाजन करून छत्तीसगड सरकारने नुकताच सुकमा हा नवा जिल्हा निर्माण केला आहे.
First Published: Tuesday, April 24, 2012, 16:01