Last Updated: Tuesday, April 24, 2012, 16:31
www.24taas.com, नवी दिल्ली 
काँग्रेसचे सरचिटणीस राहूल गांधी २७ एप्रिलला मुंबईच्या दौऱ्यावर येत आहेत. या भेटी दरम्यान राहूल गांधी प्रदेश काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची झाडाझडती घेणार आहेत. नुकत्याच पार पडलेल्या महापालिका, जिल्हापरिषद आणि नगरपालिका निवणुकांच्या निकालांचा आढावा ते घेणार आहेत.
या निवडणुकांमध्ये काँग्रेसला राष्ट्रवादीनं मात दिल्यानं प्रदेश काँग्रेसच्या कामगिरीची हायकमांडनं गंभीर दखल घेतली आहे. त्यामुळंच राहुल गांधी आणि प्रदेश काँग्रेसचे प्रभारी मोहन प्रकाश २७ एप्रिलला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत.
माटुंग्याच्या इंडियन जिमखान्यात होणाऱ्या बैठकीला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि काँग्रसचे अनेक ज्येष्ठ मंत्री आणि नेते उपस्थित राहणार आहेत.
First Published: Tuesday, April 24, 2012, 16:31