संसदेत दूध भसळीचा मुद्दा - Marathi News 24taas.com

संसदेत दूध भसळीचा मुद्दा


 www.24taas.com, नवी दिल्ली
 
 
देशात सुरु असलेल्या दूधातील भेसळीचा मुद्दा संसदेत उपस्थित करण्यात आलाय. राष्ट्रीय जनता दलाचे खासदार रामकृपाल यादव यांनी हा मुद्दा उपस्थित करुन सरकारने यामध्ये हस्तक्षेप करण्याची मागणी केली.
 
 
दूध उत्पादक शेतक-यांना कमी भाव मिळत असल्यानं सुरु असलेल्या आंदोलनाची दखल घेऊन सरकारने दुधाच्या दरात वाढ करण्याची मागणी त्यांनी केली. तसेच देशभरात दुधामध्ये सुरु असलेल्या भेसळीचा प्रश्न किती गंभीर बनलाय आणि त्यामुळे ग्राहक आणि शेतक-यांना किती मोठा आर्थिक फटका बसतोय हेही त्यांनी निदर्शनास आणून दिलं. दरम्यान या मुद्यावर शेतक-यांनी बुधवारी घेराव घालण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे केंद्र सरकार काय निर्णय घेते याकडे लक्ष लागले आहे.

First Published: Wednesday, April 25, 2012, 15:18


comments powered by Disqus