आजचा सेंसेक्स - Marathi News 24taas.com

आजचा सेंसेक्स


www.24taas.com, मुंबई
 
मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज 17 हजार 130 अंशांवर बंद झाला. त्यात 20 अंशांची घट झाली. तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा निफ्टी आज 5 हजार 189 वर बंद झाला. त्यात 13 अंशांची घट झाली.
 
आज सकाळी बाजार वधारलेल्या पातळीवर खुला झाला. पण त्यानंतर काही वेळात घट झाली. त्यानंतर शेवटपर्यंत बाजार सकारात्मक आणि नकारात्मक पातळीवर हेलखावे खात होता. शेवटी बाजार किंचीत खालच्या पातळीवर बंद झाला. सतत बदलत्या जाणा-या आजच्या बाजारात हेवीवेट रिलायन्सचे शेअर्स वाढले होते.
 
पावसाचे वेळेवर आगमन होणार असल्याच्या वृत्तामुळे ग्राहकोपयोगी वस्तू उत्पादक कंपन्याचे स्टॉक्स आज वाढलेले होते, त्यापैकी सिगारेट उत्पादक कंपनी आय़टीसीनं आज उच्चांक नोंदवला. सार्वजनिक क्षेत्रातली गॅस कंपनी गेलनं आज ५२ आठवड्यातील नीचांक नोंदवला. भांडवली वस्तू बनवणा-या कंपन्यांच्या स्टॉक्समध्ये आज घट दिसून आली. येस बॅंकेच्या स्टॉक्समध्ये आज मोठी घसरण पहायला मिळाली.
 
आज आयटी स्टॉक्स संमिश्र होते तर मेटल स्टॉक्स तेजीत होते. आज कोल इंडिया, जिंदाल स्टील, टीसीएस, आयटीसी आणि रिलायन्स या  टॉप पाच कंपन्या तेजीत होत्या, तर गेल, हिरोमोटकॉर्प, हिंडाल्को, बजाज एटो आणि टाटा पॉवर या टॉप पाच कंपन्या मंदीत होत्या.

First Published: Thursday, April 26, 2012, 20:26


comments powered by Disqus