Last Updated: Friday, April 27, 2012, 15:52
www.24taas.com, नवी दिल्ली नोकरी करणाऱ्यांसाठी एख खुश खबर आहे. पीएफवर ८.६ टक्के व्याजदर मिळणार आहे. २०१०-११ या आर्थिक वर्षात ईपीएफवर तब्बल ९.५ टक्के इतका व्याजदर दिला गेला होता. २०११-१२ मध्ये मात्र कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने तो थेट ८.२५ टक्क्यांवर आणला होता. त्यावर कर्मचारी संघटनांकडून मोठ्या प्रमाणात टीकाही झाली होती.
कर्मचारी भविष्यनिर्वाह निधीवरील (ईपीएफ) व्याजदर चालू आर्थिक वर्षासाठी ८.६ टक्के असेल, असे केंदीय कामगार मंत्री मल्लिकार्जुन खारगे यांनी राज्यसभेत जाहीर केले. गेल्या आर्थिक वर्षात व्याजदरात करण्यात आलेल्या कपातीमुळे नाराज झालेल्या देशभरातील सुमारे पाच कोटी कर्मचाऱ्यांना या नव्या घोषणेमुळे दिलासा मिळाला आहे.
व्याजदरामधील घट किंवा वाढ ही खात्याला विशेष ठेवी योजनांतील गुंतवणुकीमधून मिळणाऱ्या उत्पन्नावरून ठरविण्यात येते. गेल्यावर्षी उत्पन्न कमी असल्याने व्याजदर कमी करण्यात आला, चालू आथिर्क वर्षात तो ८.६ टक्के इतका असेल, असे खारगे यांनी सांगितले..
First Published: Friday, April 27, 2012, 15:52