राज ठाकरेंवरून 'टीम अण्णा'मध्ये वाद - Marathi News 24taas.com

राज ठाकरेंवरून 'टीम अण्णा'मध्ये वाद


www.24taas.com, नवी दिल्ली
 
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या स्तुतीवरुन टीम अण्णांमध्ये मतभेद निर्माण झालेत. कृष्णकुंजवर जाऊन  गुरुवारी अण्णांनी राज यांच्या कार्यपद्धतीचं तोंडभरून कौतुक केलं होतं.राज यांची कार्यपद्धती आपल्याला भावल्याचं सांगत अण्णांनी राजना प्रशस्तीपत्र दिलं.
 
राज ठाकरे यांनी नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकांवेळी उमेदवारांची घेतलेली परीक्षा हे उत्तम होते. त्यामुळे गुंड, चारित्र्यहिन उमेदवार राजकारणात येणार नाही. राज ठाकरे यांनी पक्षाचा आम्हाला लोकायुक्त कायद्यासाठी पाठिंबा असल्याचे आश्वासन दिले आहे. असं अण्णा काल मुंबईमद्ये पत्रकारांशी बोलताना म्हणाले होते.
 
मात्र टीम अण्णांचे सदस्य प्रशांत भूषण यांनी राज ठाकरेंच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेतलाय. राज ठाकरेंची काम करण्याची पद्धत मान्य नसल्याचं वक्तव्य प्रशांत भूषण यांनी केलंय. त्यामुळं राज ठाकरेंवरून टीम अण्णांमध्ये वाद पेटण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत.

First Published: Friday, April 27, 2012, 17:59


comments powered by Disqus