Last Updated: Friday, April 27, 2012, 22:46
www.24taas.com, मुंबई विक्रमादित्य सचिन तेंडुलकरला अखेर राज्यसभेचं नामनियुक्त सदस्यत्व मिळालंय. केंद्र सरकारनं याबाबतची अधिसूचना जारी केली आहे. त्यामुळे मास्टरब्लास्टर सचिन आता राज्यसभेचा नामनियुक्त खासदार झालाय. सचिनसोबतच अभिनेत्री रेखा आणि उद्योजिका अनू आगा यांनाही राज्यसभेचं सदस्यत्व प्राप्त झालंय. आता फक्त या तिघांच्या शपथविधीची फक्त औपचारिकता बाकी आहे.
सचिन तेंडुलकर आज संसदेत खासदारकीची शपथ घेण्याची शक्यता आहे. सचिन तेंडूलकरला राज्यसभेचे सदस्यत्व देण्यासंबंधी पंतप्रधान कार्यालयाने गृहमंत्रालयाला पत्र पाठवले होते. यावर राष्ट्रपतींचीही मोहर उमटली.सचिनबरोबरच ज्येष्ठ अभिनेत्री रेखा आणि उद्योगपती अनु आघा यांच्या नावाचीही शिफारस करण्यात आली होती. रेखानेही खासदारकी स्वीकारल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सचिन तेंडुलकरने गुरूवारी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. सचिनने खासदारकीसाठी आपला होकार दिल्यानंतर सरकारकडे तशी शिफारस करण्यात आली. ज्याच्यावर राष्ट्रपतींनी आपली मोहोर उमटवली.
तर दुसरीकडे सचिनच्या या निर्णयावर शिवसेना चांगलीच नाराज आहे. सचिननं काँग्रेसपासून सावध रहावं असा सल्ला शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिला आहे. काल सचिननं सोनिया गांधींची भेट घेतली होती. काँग्रेसनं दिलेली राज्यसभेच्या खासदारीकीची ऑफर सचिननं स्वीकारली आहे. यात नवं राजकारण होत आहे. असा शिवसेनेचं म्हणणं आहे.
First Published: Friday, April 27, 2012, 22:46