चला गोव्याला जाऊय़ा... - Marathi News 24taas.com

चला गोव्याला जाऊय़ा...

www.24taas.com, गोवा
 
वाढता उकाडा त्यातच जोडून आलेल्या सुट्ट्यांची संधी साधत देशभरातले लाखो पर्यटक गोव्यात दाखल झाले आहेत. त्यामुळं यंदाच्या हंगामात पर्यटकांची उच्चांकी संख्या झाली आहे.
 
या हंगामात आतापर्यंत २६ लाखांवर पर्यटकांनी गोव्याला भेट दिली आहे. त्यात चार लाख ८० हजार विदेशी पर्यटकांचा समावेश आहे. पर्यटकांसाठी बीचवर वॉटरस्पोर्ट्स याच बरोबर हेलिकॉप्टर सारख्या वेगळ्या पर्यटनाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
 
तळपत्या उन्हात गोव्यातले समुद्रकिनारे पर्यटकांना आकर्षित करत आहेत. निसर्गाने गोव्यावर मुक्तहस्ते उधळण केल्याने साहजिकच पर्यटक गोव्याकडे वळतात. त्यामुळे आता गोवा हे पर्यटकांनी फुलून गेले आहे.
 
 
 
 
 

First Published: Sunday, April 29, 2012, 17:53


comments powered by Disqus