Last Updated: Saturday, November 26, 2011, 16:52
झी 24 तास वेब टीम, मुंबईभारतातील श्वेत क्रांतीचे प्रणेते वर्गीस कुरिअन यांनी नुकताच नव्वदीत प्रवेश केला. कुरिअन यांच्या नेतृत्वाखाली ऑपरेशन फ्लड यशस्वी झालं आणि त्यामुळेच आज भारत जगात दुग्ध उत्पादनात पहिल्या क्रमांकाचा देश आहे. कुरिअन यांचा जन्म 26 नोव्हेंबर 1921 रोजी केरळातील कालिकत इथे झाला. कुरिअन यांनी मद्रास विद्यापीठातुन अभियांत्रिकी पदवी प्राप्त के...ली. त्यानंतर ते सरकारी शिष्यवृत्तीवर अमेरिकेला गेले आणि मिशिगन विद्यापीठातुन मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये मास्टर्स ऑफ सायन्स झाले.
अमेरिकेवरुन परतल्यानंतर 1949 साली ते कैरा जिल्हा सहकारी दुग्ध उत्पादक संघात रुजू झाले. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुढाकारानेच कैरा दुध संघाची स्थापना झाली होती आणि त्यांनी कुरियन यांना दुध प्रक्रिया यंत्रणा उभारण्यास सांगितली. कुरिअन आणि अमुलच्या यशोगाथेचा तो प्रारंभ होता. सहकारातील अमुल प्रारुप यशस्वी झालं आणि ते गुजरातमध्ये सर्वत्र अवलंबण्यात आलं. गुजरात सहकारी दुध विपणन महासंघांखाली अनेक डेअरी संघ एकत्र करण्यात आले. म्हशीच्या दुधापासून सर्वप्रथम भूकटी बनवण्याचा मान कुरिअन यांच्याकडेच जातो. त्याकाळात जगभरात गायीच्या दुधापासून भूकटी बनवण्यात येत असे. अमुलच्या यशाने प्रभावित झालेले तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्रींनी नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाची स्थापना केली. देशभरात अमुलच्या यशोगाथेची पुनरावृत्ती करण्याचा उद्देश त्यामागे होता आणि कुरियन यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. एनडीडीबीने ऑपरेशन प्लड 1970 साली लँच केलं आणि भारत जगातील सर्वाधिक दुध उत्पादन करणारा देश बनला. कुरिअन यांनी एऩडीडीबीच्या अध्यक्षपदाची धुरा 1965 ते 1998 इतक्या दीर्घ काळ सांभाळली.
आज एनडीडीबी अंतर्गत दहा दशलक्ष शेतकरी देशातील 200 दुध संघांना प्रति दिवशी 20 दशलक्ष लिटर्स दुधाचा पुरवठा करतात. देशाला दुधात स्वंयपूर्ण करणारे कुरिअन स्वत: मात्र दुध पीत नाहीत त्याबद्दल ते म्हणतात की मला दुध आवडत नसल्याने मी दुध पीत नाही. आता बोला.
First Published: Saturday, November 26, 2011, 16:52