Last Updated: Monday, April 30, 2012, 21:59
www.24taas.com, नवी दिल्ली 
नुपूर तलवारला आजची रात्र गाजियाबादच्या डासना जेलमध्ये काढावी लागणार आहे. एडीजे कोर्टानं नुपूर तलवारच्या जामीन अर्जावरील निर्णय उद्यापर्यंत राखून ठेवला आहे. त्यामुळे याप्रकरणी आता उद्या सुनावणी होणार आहे.
याआधी एडीजे कोर्टामध्ये सीबीआयनं नुपूर तलवारच्या जामीन अर्जाला विरोध केला होता. न्याय फक्त केवळ आरुषीलाच नाही तर नोकर हेमराजलाही मिळावयास हवा असं सुनावणी दरम्यान सीबीआयनं म्हटलं आहे. तसंच सीबीआयनं नुपूर तलवारला स्पेशल ट्रीटमेंट मिळू नये असंही म्हटलं आहे.
गाझियाबादच्या विशेष सीबीआय कोर्टात जामीन अर्जाची याचिका फेटाळल्यानंतर नुपूर तलवारनं गाझियाबादच्या सेशन कोर्टात जामीन अर्ज दाखल केला होता. त्यानंतर हा अर्ज एडीजे कोर्टामध्ये सुनावणीसाठी पाठवलं होता. जामीन अर्जावरील सुनावणी पूर्ण झाली आहे. आता उद्या कोर्ट यावर निर्णय देणार आहे.
First Published: Monday, April 30, 2012, 21:59