कोण बनणार राष्ट्रपती? - Marathi News 24taas.com

कोण बनणार राष्ट्रपती?


www.24taas.com, नवी दिल्ली
 
राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीवरुन राजकारण चांगलंच तापतंय. राष्ट्रपती पदाची निवडणूक सर्वसहमतीनं व्हावी आणि त्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार असल्याचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरींनी म्हटलंय. त्यासाठी एनडीएमधील सहकारी आणि इतर प्रादेशिक पक्षांशी चर्चा करून त्यांना राजी करण्याचे प्रयत्न करण्यात येणार असल्याचं गडकरींनी सांगितलंय.
 
तर यूपीएमधील तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जींनी अजूनही राष्ट्रपती निवडणूकीवर आपले पत्ते उघड केलेले नाहीत. या विषयावर अजूनही कुठलाही निर्णय झाला नसल्याचं त्यांनी म्हटलंय.
 
ममता बॅनर्जी 4 मेला सोनिया गांधींची भेट घेणार आहेत. त्यावेळी त्यांच्याकडून राष्ट्रपती पदाबाबतची त्यांची भूमिका त्या स्पष्ट करण्याची शक्यता आहे. राष्ट्रपतीपदासाठी सध्या उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, माजी राष्ट्रपती अब्दूल कलाम, अर्थमंत्री प्रणव मुखर्जी आणि मुख्य निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरेशी या चौघांची नावं चर्चेत आहेत.

First Published: Wednesday, May 2, 2012, 18:21


comments powered by Disqus