आत्महत्येसाठी हवीय राष्ट्रपतींची परवानगी - Marathi News 24taas.com

आत्महत्येसाठी हवीय राष्ट्रपतींची परवानगी

www.24taas.com, लखनऊ
 
 
लखनऊमधील फत्तेपूर येथे एक अजब प्रकार पुढे आला आहे. आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणे हा गुन्हा आहे. त्यावर एका पोलीस हवालदारांने राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनाच साकडे घातले आहे.वरिष्ठांकडून छळ होत  असल्याने जीवनाला कंटाळलेल्या पोलीस हवालदाराला आत्महत्या करायची आहे, तसे त्यांने राष्ट्रपतीनाच पत्र लिहिले आहे.
 
 
उत्तर प्रदेशमधील पोलीस हवालदार हरिश्‍चंद्र  यांना वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून अपमानास्पद वागणूक मिळत असल्याने आत्महत्या करण्याची इच्छा राष्ट्रपतींना दिलेल्या पत्रात व्यत्क केली आहे.  मी राष्ट्रपतींना पत्र लिहिले आहे. मी मुख्यमंत्री, पोलिस आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांनाही पत्र लिहिले आहे. परंतु, आतापर्यंत कुणीही दाद दिलेली नाही, हरिश्‍चंद्र  यांचे म्हणणे आहे.
 
 
या प्रकारामुळे ताणतणावात अधिक भर पडली आहे. माझ्या उजव्या डोळ्यातून आता स्पष्ट दिसत नाही. प्रचंड ताणामुळे मी वारंवार चक्कर येऊन पडत असल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले आहे. मला माझ्या असह्य छळाचा शेवट होईल, असे वाटत नाही, असे या पोलिस हवालदाराचे म्हणणे आहे. दरम्यान,  फत्तेपूर येथील पोलीस आयुक्त आर. के. चौधरी यांनी या वृत्ताचे खंडन केले आहे. पत्र मिळाले नसल्याचे चौधरी यांनी स्पष्ट केले आहे.

First Published: Friday, May 4, 2012, 12:54


comments powered by Disqus