Last Updated: Saturday, May 5, 2012, 16:08
www.24taas.com, श्रीनगर राष्ट्रीय रायफल्सचे जवान आणि जम्मू काश्मीर पोलीस यांच्या शोधमोहिमेच्या वेळी दहशतवाद्यांनी फायरिंग केले. यावेळी जवानांनी जोरदार गोळीबार केला. जवान आणि पोलीस दलाबरोबर झालेल्या चतमकीत दोन दहशतवादी ठार झालेत.
उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात आज शनिवारी सकाळी दहशतवाद्यांनी गोळीबारा केल्याचे,सरकारी सूत्रांनी सांगितले.बारामुल्ला जिल्ह्यातील पट्टण भागातील नलीगाम गावात आज सकाळी २९ राष्ट्रीय रायफल्सचे जवान आणि जम्मू काश्मीरच्या पोलीस दलातील विशेष कृती दलाचे जवान यांनी शोधमोहिम सुरु केली आहे.
नलीगाम गावात गावात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर शोधमोहिम सुरु करण्यात आली. दहशतवाद्यांनी जवानांच्या दिशेने गोळीबार सुरु केल्यानंतर प्रत्युत्तरादाखल जवानांनीही गोळीबार केला. यामध्ये दोन दहशतवादी मारले गेले असून, यांच्या दोन एके-४७ रायफल्स जप्त करण्यात आल्या आहेत.
First Published: Saturday, May 5, 2012, 16:08