पंजाब मेल घसरली... १९ जण जखमी - Marathi News 24taas.com

पंजाब मेल घसरली... १९ जण जखमी

www.24taas.com, नवी दिल्ली
 
मुंबई- फिरोजपूर पंजाब मेलला हरियाणातल्या रोहतकमध्ये अपघात झाला आहे. अपघातात रेल्वेचे आठ डबे रुळांवरुन घसरले आहेत. या अपघातात १९ प्रवासी जखमी झाले आहेत.
 
रोहतकजवळच्या खारावार गावाजवळ हा अपघात झाला आहे. पहाटे साडेतीनच्या सुमारास हा अपघात झाल्याचं सांगण्यात येतं आहे. जखमींना जवळच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.
 
रेल्वे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून अपघाताच्या कारणांचा शोध घेतला जातो आहे. अपघातामुळं ३०० मीटरपर्यंत रेल्वे रुळ उखडले आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत गार्डसोबत सहा माल डब्बे आणि एस ५ ते एस १० स्लिपर डब्बे धरून एकूण ८ डब्बे रूळावरून खाली आले आहेत.
 
 
 

First Published: Sunday, May 6, 2012, 11:28


comments powered by Disqus