भाजपला धक्का ! वसुंधराराजे यांचा राजीनामा - Marathi News 24taas.com

भाजपला धक्का ! वसुंधराराजे यांचा राजीनामा

www.24taas.com, जयपूर 
 
राजस्थान भाजपमध्ये गटबाजीला उधाण आलं आहे. राजस्थानचे माजी गृहमंत्री गुलाबचंद कटारिया यांच्या प्रस्तावित लोकजागरण यात्रेवरून पक्षात दोन गट पडले आहेत.
 
अर्थात कटारीया यांनी ही यात्रा रद्द केली आहे. माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे यांनी प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानं भाजपपुढचं संकट वाढल आहे.  त्यांचे मन वळवण्याचे प्रयत्न केंद्रीय नेतृत्व करत आहे. कोअर कमिटीच्या बैठकीत कार्यकर्त्यांचे मत विचारात घेतले नसल्याचा आरोप करत वसुंधरा राजे यांनी बैठकीतून सभात्याग केला.
 
भाजपनं मात्र राजस्थान भाजपमध्ये कुठलेही वाद नसल्याची सारवासारव केली आहे. वसुंधरा राजे यांच्या कट्टर समर्थक आमदार किरण माहेश्वरी यांच्यासह तीन आमदार आणि काही पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
 
 
 

First Published: Sunday, May 6, 2012, 15:35


comments powered by Disqus