Last Updated: Tuesday, November 29, 2011, 06:47
झी 24 तास वेब टीम, नवी दिल्ली रिटेल क्षेत्रात 51 टक्के थेट विदेशी गुंतवणुकीला परवानगी देण्याच्या सरकारच्या निर्णयावरून आजही संसदेच्या दोन्ही सभागृहात विरोधी पक्षाच्या सदस्यांनी प्रचंड गदारोळ घातला. त्यामुळे दोन्ही सभागृह तहकूब करण्यात आली.
रिटेल विषयावर आज सकाळी झालेली सर्वपक्षीय बैठक निष्फळ ठरली आहे. दुपारी 12 पर्यंत दोन्ही सभागृह तहकूब करण्यात आली. रिटेल क्षेत्रात 51 टक्के थेट विदेश गुंतवणुकीला मान्यता देण्याच्या सरकारच्या निर्णयावरून सरकार आणि विरोधक समोरासमोर आले आहेत. तसेच विरोधी पक्षाच्या सदस्यांनी प्रचंड गदारोळ घातल्यामुळे संसदेचे कामकाज उद्यापर्यंत तहकूब करण्यात आले आहे.
First Published: Tuesday, November 29, 2011, 06:47