ब्रह्मपुत्रा नदीवर सर्वात जास्त लांबीचा रेल्वे पूल - Marathi News 24taas.com

ब्रह्मपुत्रा नदीवर सर्वात जास्त लांबीचा रेल्वे पूल

www.24taas.com, तिरुचिरापल्ली
 
भारतातला सर्वांत लांब  रेल्वे पूल आता ब्रह्मपुत्रा नदीवर लवकरच बांधण्यात येणार आहे. हा पूल उभारण्याच्या कामाबाबत वेल्डिंग रिसर्च इन्स्टिट्यूट आणि हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन लिमिटेड यांनी एकत्रित येऊन एक करार केला आहे.
 
या पुलामुळे आसाम आणि अरुणाचल प्रदेश एकमेकांना जोडले जाणार आहेत. दळणवळण सोयीचे होण्यासाठी रस्ता मार्गाबरोबरच रेल्वे पूल उभारण्यात येणार आहे. त्यासाठी तब्बल ३,२३० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. २०१५ पर्यंत हा पूल बांधून तयार होईल, असा दावा या कंपन्यांनी केला आहे.
 
वेल्डिंग रिसर्च इंन्स्टिट्यूट ही सार्वजनिक क्षेत्रात काम करणाऱ्या 'भेल' या कंपनीची एक शाखा आहे. इन्स्टिट्यूटमार्फत या पुलाची देखभाल करण्यात येणार आहे. बांधकामाबाबत आणि विकास करण्यासंदर्भातील सेवा उपलब्ध करण्यात येणार आहेत, असे 'भेल'चे कार्यकारी निर्देशक  ए. व्ही. कृष्णन यांनी  सांगितले.

First Published: Wednesday, May 9, 2012, 11:03


comments powered by Disqus