मुख्यमंत्री अर्जुन मुंडांच्या हेलिकॉप्टरला अपघात - Marathi News 24taas.com

मुख्यमंत्री अर्जुन मुंडांच्या हेलिकॉप्टरला अपघात

www.24taas.com, रांची
 
झारखंडचे मुख्यमंत्री अर्जुन मुंडा यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला आहे. रांची विंमानतळावर लँडिंग दरम्यान हा अपघात झाला आहे. अपघातातून मुंडा बचावले असून त्यांच्या पायाला जखम झाली आहे. मुंडांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल कऱण्यात आलं आहे.
 
अर्जुन मुंडा यांच्या हेलीकॉप्टरला अपघात झाला मात्र त्यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. हा अपघात हेलीकॉप्टर योग्यप्रकारे लॅण्डिंग न केल्याने झाला आहे.
 
अपघात मोठा असला तरीही मुख्यमंत्री अर्जुन मुंडा हे सुरक्षित आहेत. त्यांना रांचीच्या अपोलो रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघाताचं तात्पुरतं कारण समजू शकलेलं असलं तरीही नक्की अपघात कशाने झाला हे कळू शकलेलं नाही.
 
 

First Published: Wednesday, May 9, 2012, 13:35


comments powered by Disqus