Last Updated: Wednesday, May 9, 2012, 14:18
www.24taas.com, नवी दिल्ली 
देशातल्या विधानसभा निवडणुकीतल्या अपयशाच्या पार्श्वभूमीवर सोनिया गांधींनी काँग्रेस नेत्यांची चांगलीच झाडाझडती घेतली. काँग्रेस खासदारांच्या बैठकीत सोनियांनी नेत्य़ांना खडे बोल सुनावले. अनेक राज्यांमध्ये विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस अपयशी ठरल्याचंही त्या म्हणाल्या.
निवडणुकीत पक्षांतर्गत गटबाजीमुळेच काँग्रेसचा पराभव झाल्याचंही त्यांनी सांगितलं. म्हणून यापुढे पक्षात बेशिस्ती खपवून घेतली जाणार नाही. असंही त्या सांगायला विसरल्या नाहीत.
फक्त योजनांना निधी देऊन भागणार नाही तर तो पैसा सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचला पाहिजे असंही सोनिया गांधींनी सुनावलं. एनसीटीसी कायद्याबाबत केंद्र आणि राज्य सरकारमध्ये विश्वासाची भावना निर्माण झाली पाहिजे असंही त्या म्हणाल्या.
First Published: Wednesday, May 9, 2012, 14:18