हरियाणात महिलांना जिन्स, टी शर्टवर बंदी - Marathi News 24taas.com

हरियाणात महिलांना जिन्स, टी शर्टवर बंदी

www.24taas.com,चंदीगड
 
 
हरियाणा सरकारने महिलांसाठी नवा फतवा काढला आहे. महिलांना जिन्स आणि टी-शर्ट घालण्यास बंदी करण्यात आली आहे. जर या नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे स्पष्ट म्हटले आहे. त्यामुळे महिलांना आता सावधनता बाळगावी लागणार आहे.
 
 
हरियाणा महिला आणि बालकल्याण विभागाने एक नोटीस जारी करून महिलांना कामावर येताना जिन्स आणि टी-शर्ट घालण्यास बंदी केली आहे. महिलांसाठी ड्रेस कोड ठरविण्यात आला आहे. यापुढे कामावर येताना सलवार कमीज किंवा साडी घालण्यास सांगण्यात आले आहे.
 
 
महिलांसाठी जिन्स आणि टी-शर्ट ही साजेशी वस्त्रे नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे, असे महिला आणि बालकल्याण विभागाने बजावलेल्या नोटीसमध्ये नमूद केले आहे. दरम्यान, पुरुषांनाही ड्रेस कोड ठरविण्यात आला आहे. त्यांनाही  ट्राऊजर आणि शर्ट घालूनच कार्यालयात आले पाहिजे. या नोटीसचे पालन न करणाऱ्या कर्मचाऱ्याविरुद्ध कारवाई करण्यात येणार असल्याचे विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

First Published: Wednesday, May 9, 2012, 15:05


comments powered by Disqus