तंतुमय आहार ठेवतो हृदय निरोगी - Marathi News 24taas.com

तंतुमय आहार ठेवतो हृदय निरोगी

www.24taas.com, लंडन
 
 
आपल्या जेवणात फायबरचे प्रमाण जास्त ठेवले तर हृदय निरोगी राहण्यास मदत होते. फायबर म्हणजे तंतुमय आहार होय. आपला आहार आणि आरोग्य यांचा चागंला संबंध आहे. त्यामुळे चांगले आरोग्य ठेवण्यासाठी तंतुमय आहारावर भर दिला पाहिजे.
 
 
आज अनेक जण फास्टफूडला प्राधान्य देताना दिसत आहेत. त्यामुळे त्यांची तब्बेत बिघडत आहे. काय आहार घ्यायचा ते महत्वाचे आहे. आपला आहार आणि आरोग्य यांचा अतिशय जवळचा संबंध आहे. चांगले आरोग्य ठेवणे आपल्या हातात आहे. फळे, भाज्या आणि सलाडमधून मिळणार फायबर (तंतू) हृदयासाठी अत्यंत फायदेशीर आहे. तंतुमय खाद्यपदार्थ नियमित सेवन केल्यास हृदयरोगांपासून बचाव होतो. याचा जास्त फायदा महिलांना होतो, असे एका संशोधनातून स्पष्ट झाले आहे.
 
 
लंडनमधील लुंड विद्यापीठाच्या संशोधकांनी वीस हजारांपेक्षा जास्त लोकांवर संशोधन केले. त्यानंतर निषर्ष्क काढला गेला आहे. संशोधनादरम्यान लोकांच्या खाण्याबाबतच्या सवयी पाहण्यात आल्या. मेद, प्रथिने आणि कार्बोदके यांच्या प्रमाणावर नजर ठेवून विश्लेषण करण्यात  आले. ज्या महिलांनी जास्तप्रमाणात तंतुमय आहार घेतला. त्यांच्या आरोग्यात सुधारणा झाल्या. तर २५ टक्के हृदयरोग कमी झाल्याचे दिसून आले. तर पुरूषांमध्ये हे प्रमाण खूपच कमी दिसून आले. भाज्याचे सेवन भरपूर केले तर यातून जास्त प्रमाणात तंतुमय  (फायबर) मिळते. तसेच ब्रेड खल्ला तरीही यात वाढ होते, असेही स्पष्ट झाले आहे.

First Published: Wednesday, May 9, 2012, 16:50


comments powered by Disqus